खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर-कुमार गटासाठी फिटनेस कॅम्पचे आयोजन..
जिल्ह्यातील पहिला उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴खेड,दि.०४: खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर-कुमार गटातील खेळाडूंसाठी फिटनेस कॅम्पचे आयोजन दि.१ ते १५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सदर कॅम्प खेड तालुका क्रीडा संकुल खेड येथील मैदानावर सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत होईल. या कॅम्पचा उदघाटन सोहळा दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता तालुका क्रीडा संकुल खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमतः असो.जेष्ठ सल्लागार कै. चंद्रकांत पार्टे, माजी सदस्य कै. दत्ताजी शिंदे, कै. दिलीप साळवी यांना श्रद्धांजली वाहिली.
लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावाधी नंतर खेड तालुका कब्बड्डी असो.कडून घेण्यात येणार हा जिल्ह्यातील पहिलाच फिटनेस कॅम्प आहे.खेळाडूंचा नियमित सराव होऊन संभाव्य होणाऱ्या स्पर्धांसाठी ते तयार व्हावेत हा या कॅम्पचा उद्देश आहे.
या फिटनेस कॅम्प शिबिराच्या उदघाटन सोहळ्यासाठी खेड मंडणगड दापोली मतदार संघाचे माजी आमदार तथा खेड तालुका कब्बड्डी असो.चे संस्थापक अध्यक्ष संजय कदम खेड नगर परिषदचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, खेड नगरपरिषद गटनेते नगरसेवक प्रज्योत तोडकरी, नगरसेवक श्री.तौसिफ खोत, राजू संसारे उपस्थित होते.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना माजी आमदार संजय कदम यांनी जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या खेड कब्बड्डी असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केलेच शिवाय असोसिएशनला यापुढेही लागणारे सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.अन्य मान्यवर व असोसिएशन पदाधिकारी यांनी फिटनेसचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून विशद केले. तसेच या सुवर्ण संधीचा फायदा उठवण्याचे खेळाडूंना आवाहनहि केले.या विशेष कॅम्पसाठी खेड मधील प्रसिद्ध उद्योजक सतिश दरेकर व खेडचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर या बंधूंच्या वतीने सहभागी सर्व खेळाडूंसाठी आकर्षक किट देण्यात आले.
याप्रसंगी खेड कब्बड्डी असो.अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, सचिव रवींद्र बैकर, जिल्हा कार्यकारणी असो.सदस्य तथा कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, कार्याध्यक्ष समद बुरोंडकर, उपाध्यक्ष आनंद हंबीर, सहसचिव शरद भोसले, कार्यकारणी सदस्य दिपक यादव, सुखदेव पवार अमोल दळवी, जेष्ठ सल्लागार दिलीप कारेकर, प्रो कब्बडी पंच विलास बेंद्रे, जेष्ठ पंच मधुकर शिंदे, संतोष शिर्के, सौ.संपदा गुजराथी तसेच सुनील साळोखे, रुपेश तरडे, किशोर साळवी, प्रदिप भोसले, शुभम बिर्जे, विकी कदम, सुरज जाधव व अन्य कब्बड्डी प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव शरद भोसले यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दाजी राजगुरू यांनी केले
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

