कणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

जानवलीच्या भाजप सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश;भाजपला मोठा धक्का

आ.वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

कणकवली,दि.१९:-जानवली गावात शिवसेनेने भाजप पक्षाला मोठा धक्का दिला आहे.जानवली गावचे सरपंच शिवराम राणे यांच्यासह अमोल राणे, रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री ह्या भाजप कार्यकर्त्यानी आज शिवसेनेत प्रवेश केला.कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सचिन सावंत,हर्षद गावडे, भालचंद्र दळवी, कन्हैया पारकर, रामू विखाळे, दामू सावंत, संदेश पटेल, राजु राठोड, विलास कोरगावकर, प्रसाद अंधारी, दादा भोगले, सत्यवान राणे, दीपक दळवी, भालचंद्र दळवी, संजय पारकर, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!