आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने साजरी करण्यात आली “रोटरी” या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक पाॕल हेरिस यांची जयंती..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-१९ :- जगाला मित्रत्व, विश्व बंधुत्व आणि शांततेचा संदेश देत “रोटरी” या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक पाॕल हेरिस यांची जयंती आज रोटरी क्लब, सावंतवाडीच्या मोजक्याच सदस्यानी कोविड-19 चे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो.अनंतराव उचगावकर यानी पॉल हेरिस यांच्या फोटोला फुले वाहिली, केक कापला आणि पॉल हेरिस यांच्या जीवनाला स्पर्श करणारे छोटेखानी भाषण केले. ते म्हणाले की, पॉल हेरिस यांचा जन्म अमेरिकेतील रॕसीन गावी १९ एप्रिल १८६८ झाला. त्या काळातील समाज व्यवस्था आणि परिस्थितीचा विचार करुन पेशाने वकिल असलेले “पॉल हेरिस” यानी तिन मित्रांच्या सहकार्याने रोटरीची स्थापन अमेरिकेतील शिकागो या पहिल्या क्लबची २३ फेब्रुवारी १९०५ साली स्थापना केली. या घटनेला आज ११५ वर्षे झाली.रोटरी स्थापनेचा उद्देश केवळ मैत्री आणि बंधुभाव हाच होता. पुढे त्याकाळातील समाजाची गरज लक्षात घेऊन शिकागो शहरात पहिले सार्वजनिक शौचालय बांधुन पहिल्या समाज सेवेची मुहूर्तमेढ रोहिली. आणि बघताबधता ही समाजसेवेचा वृक्ष जगभर पसरला. अशा अनेक आठवणीना उजाळा दिला. हा कार्यक्रम रोटरी चॕरिटेबल ट्रस्टच्या जागेत करण्यात आला.

यावेळी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर ट्रस्टचे सचिव रो.वसंतराव करंदीकर, IPP रो.CA.सुधीर नाईक, रो.साईप्रसाद हवालदार, रो.आनंद रासम, रो.प्रदिप शेवडे, रो.नागेश कदम आणि फिजिओथेअरपी सेंटरच्या डॉ.रुक्विया खान उपस्थित होते. सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितीताना शुभेच्छा दिल्या आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!