◾सर्वत्र कोरोनाची छाया असताना, कॉलेज युवक युवतींचे प्रेम मात्र ऊतू चालल्याची घटना..
◾प्रेमासाठी वाटेल ते म्हणत प्रियसी व प्रियकर सावंतवाडीच्या निर्जन ठिकाणी बागेत दाखल..
◾मुलीच्या आई-वडिलांना माहिती मिळताच ते ठिकाण गाठत दिला जोड्यांचा प्रसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-१८ :- राज्यात सर्वत्र कोरोना लाॅकडाउन ची छाया असताना व संचारबंदीज्ञ असताना कॉलेज युवक युवतींचे प्रेम मात्र ऊतू चालल्याची घटना घडली आहे, सावंतवाडी शहरातील एका बागेमध्ये असेच कॉलेज युवक युवती प्रेमाचे चाळे करत असताना मुलीच्या आई-वडिलांनी ते ठिकाण गाठत मुलीला व तिच्या प्रेम विराला येथेच्छ चौप दिल्याची घटना घडली.
तुमची मुलगी एका डोंगराच्या कुशीत असलेल्या बागेत एका युवका सोबत प्रेमाचे चाळे करत आहे अशी माहिती एका शेजारच्या व्यक्तीनी दिली, त्यानंतर आई थेट वडिलांना घेऊन त्या बागेमध्ये मध्ये पोहोचली तर आपली मुलगी एका मुलाच्या बाहुपाशात असल्याचे दिसतात तिलाज्ञ राग अनावर झाला व तीने पायातील चपलेने आपल्या मुलीला व त्या प्रेम वीराला यथेच्छ चोप दिला,
अक्षरशः प्रेमवीर हाता पाया पडत त्या बगीच्या मधून आपली मोटारसायकल घेऊन पसार झाला, तर त्या मुलीला अगदी फरपटत आई-वडिलांनी नेल्याची घटना घडली.
कोरोना काळात संचारबंदी असताना प्रेमवीरांना मात्र कोणी रोखू शकत नाही याची प्रचिती आली असल्याचे बोलले जाते प्रेमासाठी वाटेल ते करत हा प्रेम बगीच्यामध्ये पोहचला व प्रेमीका त्याठिकाणी हजर झाली व निर्मनुष्य असलेल्या या बगीच्यामध्ये प्रेमाला रंग चढू लागला. एका मद्यपीने ही घटना पाहिली व त्याला ती मुलगी ओळखीचे वाटल्याने त्याने त्या बगीच्यामध्ये जात तिचे निरीक्षण केले व तै तिथून निघून गेला व मुलीच्या आई ला फोन करून याची माहिती दिली अवघ्या अर्ध्या तासातच मुलीचे आई-वडील घटनास्थळी दाखल झालेत,व पुढील प्रकार घडला.

