डीजीसीएच्या नाँम्स् प्रमाणेच चिपी विमानतळ रन वेचे काम करा !

खा.विनायक राऊत : पाहणी दरम्यान विकासक कंपनीला सुचना…

वेंगुर्ला(चिपी):- विमानतळाच्या साईडपट्टीचे काम एअरपोर्ट अथाँरेटीच्या सुपरव्हिजनखाली डीजीसीएच्या नॉम्स् प्रमाणेच करा अशा सक्त सूचना खा.विनायक राऊत यांनी विमानतळ पाहणी दरम्यान विकासक कंपनी (आयआरबीला) यांना दिल्या.खा. राऊत यांनी विमानतळाच्या कामाची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान चिपी विमानतळाला सोमवारी एयरपोर्ट अथॉरिटीचे पथक येऊन पाहणी करणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले व उद्घाटनाच्या तारीख पे तारीख जाहीर झालेल्या चिपी विमानतळ प्रकल्पाच्या रनवेचे काम निकृष्ट पद्धतीचे झाल्याने डीजीसीएने चिपी विमानतळाला अधिकृत परवाना दिला नव्हता. याबाबत रणवेचे काम डीजीसीएच्या नॉम्सप्रमाणेच झाले पाहिजे असे खा.गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील अंदाज समितीने विकासक आयआरबी कंपनीला सांगितले होते, त्यानंतर आयआरबी कंपनीने रनवेचे काम हाती घेतले. या रनवेच्या कामासाठी पंजाब व औरंगाबाद या ठिकाणाहून मशिनरी दाखल झाली आहे.या मशिनरीच्या माध्यमातून विमानतळाच्या रनवेचे स्क्रापिंग व मिलिंकचे काम सुरू आहे.जुने कार्पेट पूर्णतः काढून त्या ठिकाणी नवीन कार्पेट टाकण्यात येणार आहे.या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोल्हापूर एअरपोर्टचे संचालक श्री. कटारिया यांच्याशी फोन करून चर्चा केली व त्यांना विमानतळाच्या साइईटवर भेट देण्याबाबत विनंती केली आहे. दरम्यान रनवेचे काम दि.15 मेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लाइटिंग,पेंटिंग व अन्य किरकोळ कामे आहेत ती कामे सुद्धा पूर्ण करून घेण्याबाबत विमानतळ विकास कंपनीला सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!