प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतील दुरुस्तीच्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी..
▪️पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे खा. विनायक राऊत यांची मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : देवगड
🎴देवगड,दि.२३: खासदार विनायक राऊत यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून देवगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसंदर्भात संयुक्त बैठक घेणेबाबत लेखी पत्र देवून विनंती केली आहे. यामध्ये देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेमध्ये शिरगांव ते देवगड अशा एकूण ९ गावांचा समावेश असून सदरची योजना सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून ग्रामपंचायत यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. परंतु लाखो रुपयांची थकीत पाणी पट्टीची देयके ग्रामपंचायतींच्या माथी मारण्यात आली आहेत. त्यावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून २ टक्के व्याज दरवर्षी आकारले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची देयकांची थकित रक्कम वाढत आहेत तसेच जिल्हा परिषद दरवर्षी सदरच्या नळपाणी योजनेच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करीत आहे.
आता देवगड नळपाणी योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदरच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा अहवालासह पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना खा. विनायक राऊत यांनी सादर केलेली आहे. तसेच देवगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसंदर्भातील विविध अडचणीबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात आयोजित करणेबाबत विनंती केली आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_