४४ वयोगटापर्यतच्या सर्व फार्मासिस्ट किरकोळ व घाऊक औषध विक्रेते व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविड लस प्राधान्याने द्यावी
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
कणकवली,दि.१७:-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या काळात सर्व फार्मासिस्ट किरकोळ व घाऊक औषध विक्रेते तसेच त्यांचे कर्मचारी काम करत आहेत.ह्या कोरोना महामारीत काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.आता दुसऱ्या टप्प्यात आलेली कोरोना ची लाट भयंकर कडक असून.ह्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.१८ ते ४४ वयोगटातील सर्व फार्मासिस्ट किरकोळ व घाऊक औषध विक्रेते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविड लस प्राधान्याने मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.
पालकमंत्री उदय सामंत यांना याबाबतचे निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, माजी जिल्हाध्यक्ष नंदू उबाळे अमर गावडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

