जिल्ह्यात आज आणखीन १३१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…
सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत. दरम्यान आज आणखी १३१ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून ४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मृतांमध्ये जांभवडे-कुडाळ येथील ४१ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सावंतवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष आहे. त्याला हृदय विकाराचा आजार होता. तिर्लोट-देवगड येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला अस्थमाचा आजार होता. तर सिद्धार्थवाडी वैभववाडी येथील ८५ वर्षीय महिलेला आहे. तिला मधुमेहाचा आजार होता.

