◾नावळे गाव बनला कोरोनाचा हाँटस्पाँट..
◾ प्रशासनाकडून घोषित करण्यात आला कंटेनमेंट झोन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-१७ :- तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होऊ लागला आहे. दिगशी गावापाठोपाठ नावाळे गावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. याची दखल घेत प्रशासनाकडून नावळे गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. गावात सध्या पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात दिगशी नंतर नावळे गाव कोरोनाचा हाँटस्पाँट बनला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामदास झळके यांनी या गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव, मंडळ अधिकारी श्री पावसकर, तलाठी श्रीमती माळी उपस्थित होते. नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गावामध्ये फिरू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार झळके यांनी केले. नावळे ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावामध्ये दोन दोन दिवस सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

