◾नावळे ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावामध्ये करण्यात आली सॅनिटायझर फवारणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴 वैभववाडी,दि-१७ :- नावळे गावात दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आत्तापर्यंत पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर करोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने याची दखल घेत नावळे ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार महेश रावराणे दिगंबर गुरव पत्रकार संजय शेळके यांच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण गावात दोन दिवस फवारणी करण्यात आली गावचे माजी पोलीस पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास रावराणे, गणपत सुतार, सूर्यकांत सावंत, उदय रावराणे, गुणवंत राणे, रवींद्र गुरखे, रोहित गुरव, अक्षय गुरव बाळा गुरव, दिनेश गुरव ,सचिन गुरव, प्रसाद रावराणे, ऋतिक रामाने ,शंकर गुरखे, लक्ष्मण गुरखे, अजित कदम,आदी ग्रामस्थांनी. मोलाचे सहकार्य केले

