आणखीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन जबरदस्तीने नागरिक – व्यापारी वर्गावर लादलेला बडगा…

◾…यामुळेच आहेत नागरिक आणि व्यापारी नाराज

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴सिंधुदुर्ग : दि. १७ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते घेतं, महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आणि शनिवार – रविवार विकेंड लॉकडाऊन लावला. परंतु त्यांना जनतेचे होत असलेले हाल दिसत नसल्याचे आढळून आले आहे. सर्व जनता आणि व्यापारी वर्ग या निर्णयाला पाठिंबा देत आहे, याच स्वागत करतं आहे. त्यातच थोडी नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना मध्यस्ती ठेवत सरकार गोर – गरीब जनता आणि हातावर पोट असलेले व्यापारी यांच्यावर सर्व निर्बंध लादत आहे. यांच्या पोटा – पाण्याचं काय असं विचारलं, तर तांदुळ आणि गहु दिले म्हणुन मुख्यमंत्री सांगतात. परंतु एका कुठुंबात २० ते २५ माणसं राहतात, त्यांना हे २-४ किलो तांदुळ गहु पुरतील का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

लाईटबिल चालु आहे, बँकांचे हप्ते सुरु आहेत. बँकवाले फोन करुन नागरिकांना त्रास देत आहेत. जे भाड्याने रूम घेऊन राहतात, त्याच भाड कोण आणि कसं भरणार? व्यापारी जेथे दुकान घालुन व्यवसाय करतात, त्या दुकान किंवा गाळ्यांच भाड कोण आणि कसं भरणार? ग्रामीण भागात घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यासाठी सरकारी अधिकारी येत आहेत. त्यांना आळा कोण घालणार? असे प्रश्न जनता सरकारला विचारत आहे.

या सर्व गोष्टींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावा. सरकारने योग्य निर्णय घ्यावा आणि जनता, व्यापारी वर्गाचे हे प्रश्न सोडवावेत. असं जनतेच आणि व्यापारी वर्गाच मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!