कणकवली पटवर्धन चौकात आज सकाळपासुनच आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजेन टेस्ट सुरू…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १७ पटवर्धन चौकात आज सकाळपासुनच आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये कलमठ गावातील स्थायिक असलेले आणि तालुक्यातील एक कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आहेत.
१ मेपर्यंत सलग संचारबंदी लागु करून, विकेंड लॉकडाऊन केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काल मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र कणकवली शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शनिवार आणि रविवारी मेडिकल स्टोअर्स, दवाखाने वगळता सर्व अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार शहरातील सर्व बाजारपेठ सकाळपासुन बंद होती. पटवर्धन चौकात पोलीस बंदोबस्तासह आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे. आरोग्य पथकाकडुन लक्षणे असणारे आणि विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यां नागरिकांची अँटीजेन टेस्ट केली जात आहे.
या टेस्टमध्ये एक प्राथमिक शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असुन, आरोग्य विभागाने तात्काळ त्या पेशंटला पुढील सुचना दिल्या आहेत.

