आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तालुक्यात सापडले २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-१६ :- तालुक्यात आज नव्याने तब्बल २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात वैभववाडी ५, दिगशी २, एडगांव ४, करुळ ३, नाधवडे २, नावळे ५, सोनाळी ५ यांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तालुक्यात एकूण रुग्ण संख्या सव्वा चारशे वर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात एकूण ३८ ठिकाणे कंटेनमेंट झोन करण्यात आली आहेत. पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. आरोग्य यंत्रणा खुपच तोकडी पडत आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास मास्क लावावे. अशा सूचना वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!