आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾सडुरे येथे नव्याने रास्त दराचे धान्य दुकान प्रशासनाच्या वतीने सुरू..

 

◾तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-१६ :- सडुरे येथे नव्याने रास्त दराचे धान्य दुकान प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या रास्त धान्य दुकानाचे उद्घाटन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते पार पडले. हे रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी वैभववाडी तालुका भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, ग्रा.पं. सदस्य नवलराज काळे, महिला बचत गट सडूरेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कोरोना महामारीत गावात रेशन दुकान सुरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
उद्घाटन प्रसंगी पुरवठा अधिकारी संभाजी खाडे, रामेश्वर दांडगे, महसूल विभागाचे अधिकारी श्री कैलास पवार, डॉ. प्रियांका बंडगर, माजी उपसरपंच वैशाली सावंत, माजी सरपंच सत्यवान डांगे, गोविंद भोसले गुरुजी, डी. के. सुतार, संजय जंगम, ग्रा.पं. सदस्य नवलराज काळे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, निम अरुळे गावच्या सरपंच सविता कदम, बबन रावराणे, सत्यवान रावराणे, महेंद्र जंगम, दत्ताराम रावराणे, जय भवानी महिला बचत गट अध्यक्षा दीक्षा रावराणे, मालती रावराणे, केशव राऊत, श्रीकांत उर्फ बाळा रावराणे, रघुनाथ चव्हाण, राऊत महाराज, मोहन जंगम, मधुकर सावंत, सुरेखा चव्हाण, मंगेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!