आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾मुंबई- गोवा हायवेवर असलेली बांदा बाजारपेठे नागरिकांकडून राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे लॉक डाऊनची कडकडीत बंद..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-१६ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा ही एकमेव बाजार पेठ ही ग्रामिण भागाशी संबधित आहे. बांदा बाजारपेठ व दशक्रोशीतील व्यापर्यांनी व नागरिकांकडून राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे गरुवारी लॉक डाऊन कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू त्यामुळे या पुढील १५ दिवसांत ग्रामिण शेतकरीं, छोटे व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती बिकट होणार आहे. पण या गतवर्षीच्या लॉकडाउन व पुर यासारख्या संकटकाळातून बाहेर पडत असता बांदयात पुन्हा मिनी लॉकडाउन नंतर १५ दिवसांचे लाँकडाऊन सुरु झ‍ाले. अनेक कष्ठकरी गरिब शेतकर्यांचे बरेच धंदे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. या शेतकरी वर्गाचा एप्रिल व मे या दोन महिन्यात इतर वर्षभराचे आर्थिक गणित अवलबून असते. हे शेतकरी काजू,कोकम, नारळ, केळी, पेपई यासारखी विविध प्रकारची गावठी भाजी पाला विक्री साठी बांदा बाजारपेठेत येतात. पण कोरोना लाँकडाऊन मुळे या सामन्य शेतकरी बांद्यातील व्यापार्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. गतवर्षीप्रमाणे असेच लॉकडाउन सुरु राहिल्यास कुटुंब कसे चालणार ? याबाबत बांद्यातील शेतकरी व छोटे व्य‍ापारी चिंतेत सापडला आहे. यासाठी बांदा परीसर हा ग्रामिण भागात येत असल्याने शहरी भागातील निर्बंध लादु नये. सरकारने बांदा बाजारपेठ व ग्रामिण भागात लाँकडाऊन शिथीलता देण्यासंबधी नागरीकांकडून मागणी होत आहे.

गतवर्षीप्रमाणे लाँकडाऊन सुरु राहिले तर दुकानाचे भाडे, विज बिल, कामगारांचा पगार, घराचा खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, घरातील वयस्कर आजारी व्यक्तीचा औषधांचा खर्च बँक कर्जाचे हफ्ते भरण कठीण झाले. तरीही काही व्यापर्यांनी गतवर्षी दुकाने बंद असूनही लाईट बिल, दुकान भाडे, कामगारांचे पगार, बँकांचे व्याज सहीत हप्ते भरण्यात आले. आणि आता येण्यार्या वर्षीतील खर्च कसा करायचा ? असे विविध प्रश्न व्यापार्यांना सतावत आहे.

हे सामान्य शेतकरी सोमवारी आठवडा बाजार व इतर दिवशी जे धंदे हातांच्या पोटावर चालतात. त्यांना ग्रामिण भागात काही प्रमाणात सुट देण्यात यावी. मुंबई, पुणे,मेट्रो सिटी प्रमाणे शहरी भागातील जी बंधने घातलेली आहे. ती काही प्रमाणात शिथील व्हावी अशी मागणी बांदा व्यापारी अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केली. मुंबई -गोवा महामार्गवर नेहमी गजबजलेला असतो. गुरुवारी बांदा सर्कल महामार्गावर शांतात परसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!