आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सलग तीन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू वाहतुकी विरोधात तीन कारवाया..

 

◾राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलिची धडक मोहीम..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा,दि-१६ :- बांदा शहर तसेच दशक्रोशीतील असलेली गावे ही गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने गोवा राज्यातून अनधिकृत दारू वाहतूक ही बांदा तसेच आजूबाजूच्या गावा मधून चोरट्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात केली जाते, ह्या चोरट्या पध्दतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात इन्सुलि, राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या तीन दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवरील कारवाईने, दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले गेले आहेत. सलग झालेल्या दारू कारवाईनंतर अनधिकृतपणे दारू वाहतूक करणाऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली दिसून येत आहे.

पहिल्या कारवाईत भालावल- तळकट टिठा, ओटवणे रस्ता इथे करण्यात आली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चोरटी दारू वाहतूक होणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क इन्सुलि विभागाच्या पथकाला मिळाली होती. ही खबर मिळताच सापळा रचून गोव्यावरून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर चारचाकी यूपी ३२ डी एफ ३३३३ पकडण्यात आली. यावेळी गाडी मध्ये दारूचे विविध प्रकारचे बॉक्स सापडून आले. मात्र काळोखाचा फायदा घेत चालक फरार झाला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री १२.१० च्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दारू साठा तसेच वाहणासह एकूण १४,३१,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई ही मळगाव पुलाजवळील सुतारवाडी जवळ. राष्ट्रीय महामार्ग ६६ वर करण्यात आली , बुधवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या टेम्पो क्र एमएच ४८ बी एम ९२५६ अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी टेम्पो च्या मागील हौद्यात चोरकपा आढळून आला. त्यामध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे विविध प्रकारचे एकूण १४ बॉक्स आढळून आले. या कारवाईत वाहनचालकावर कारवाई करण्यात आली असून, दारूसाठ्यासह एकूण ८ लाख ४८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरी कारवाई गुरवारी मध्यरात्री १२.१० च्या सुमारास वेत्ये येथे झाराप पत्रादेवी महामार्गावर करण्यात आली. गोव्या वरून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या पांढऱ्या रंगाचा टेम्पो एमएच ०७ पी ०७३७ पाठलाग करून थांबविण्यात आला. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता गोवा बनाविटीच्या दारूचे एकूण १७५ बॉक्स आढळून आले. या कारवाईत वाहनासह चालकावर बेकायदेशीर दारू वाहतुक प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत दारूसाठ्याश एकूण १८ लाख ९४हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ बी एच तडवी, निरीक्षक एस एच चव्हाण, दुय्यम निरीक्षक ऐ ऐ पाडळकर, कर्मचारी रमेश चंदूरे, शरद साळुंखे , संदीप कदम, शिवशंकर मुपडे, एच आर वस्त यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एस एच चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!