◾वाॅटर एटीएमचा नगरपालिकेशी कोणताही संबंध नाही ; नगरसेविका लोबो यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अकलेचे तारे तोडू नये ; नगराध्यक्ष संजू परब
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-१६-: शहरात बसविण्यात आलेल्या वाॅटर एटीएम याचा नगरपालिकेशी कोणताही संबंध नसून केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अकलेचे तारे तोडू नयेत असा जोरदार पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरसेविका सौ लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर केला आहे.
या कामाची चौकशी करायची असेल तर नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करून पालकमंत्र्यांची चौकशी करावी. असा चिमटा देखील त्यानी यावेळी काढला आहे.

