◾कुंब्रल मार्गे होणारी खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली..

 

◾लॉकडाऊन काळात खुलेआम सुरू असलेली ही खडी वाहतूक नक्की कोणाच्या आशिर्वादाने ; ग्रामस्थांचा प्रश्न

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴दोडामार्ग,दि-१६ :- परमे येथील खडी कुंब्रल मार्गे घेऊन जात असताना कुंब्रल ग्रामस्थांनी खडी वाहतूक करणारे डंपर रोखुन धरले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी येथुन खडी वाहतूक होता कमा नये असे आदेश दिले असताना सुद्धा ही खडी वाहतूक केली जात आहे.

तसेच नेमके लॉकडाऊन सुरू असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली खडी वाहतूक नक्की कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे असा प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!