कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾पर्यटन महामंडळाने पालिकेच्या उद्यानात बसवण्यात आलेली खेळणी निकृष्ट ; सत्ताधारी नगरसेवकाचा आरोप

 

◾ माजगाव – चराठ्याला १० मे पाणी बंद..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१५ :- पर्यटन महाविकास मंडळाच्या वतीने येथील पालिकेच्या उद्यानात लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली खेळणी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आज सत्ताधारी गटाचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी केला. दरम्यान ही खेळणी तात्काळ बदलून घ्यावीत, तो पर्यंत प्रकल्प ताब्यात घेवू नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर पालिकेच्या माध्यमातून माजगाव, चराटा ग्रामपंचायतीला पुरवठा करण्यात येणारे पाणी १० मे पासून बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील वाढलेली नळ कनेक्शन आणि पाणी समस्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक आज श्री. परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी अजेंड्यावर ठेवण्यात आलेल्या पालिकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले शिवा उद्यानांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून इलेक्ट्रॉनिक खेळणी चालवण्याची सेवा पुरवण्याबाबत विषयावरून चर्चा झाली. सदर प्रकल्पांतर्गत उद्यानांमध्ये बसवण्यात आलेली खेळी निकृष्ट दर्जाची असून सदरचा प्रकल्प पालिकेने आपल्या ताब्यात घेऊ नये, असे श्री. नेवगी यांनी सांगितले. तर विरोधी गटनेते अनारोजीन लोबो यांनीही सदरचा प्रकल्प पर्यटन विकास महामंडळाने चालवावा व त्याचे भाडे पालिकेला द्यावे, असे म्हणणे मांडले.

यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सदर प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती बाबत २०१७ ला ठराव करताना त्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले मात्र तरीही अद्याप पर्यंत प्रकल्प पालिकेने हा प्रकल्प ताब्यात घेतला नसून संबंधित महामंडळाला याबाबत नोटीस बजावून सर्व नगरसेवक व पालिकेला विश्वासात घेऊनच व सदर खेळण्याची पाहणी करुनच याबाबत निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. शहरातील पाच किलोमीटरच रस्ते खोदाई करून जिओ कंपनीला ऑप्टिकल फायबर केबल घालण्यासाठी रनिंग मीटर प्रमाणे ३२३४ रुपये नुकसान भरपाई आकारुन सर्वानुमते मंजुरी देण्यात आली मात्र यावेळी झालेल्या चर्चेत कंपनीकडून रनिंग मीटर मागे जादा रक्कम आकारण्यात यावी अशी मागणी विरोधी गटनेते अनारोजीन लोबो यांनी केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन पटीने नगरपालिकेने हा दर आकारला असल्याचे मुख्याधिकारी श्री जावडेकर यांनी सांगितले तर संबंधित कंपनीला काम करायचे असल्यास येत्या महिन्याभरात त्यांनी काम करावे जून महिन्यात रस्त्याची खोदाई करायला दिली जाणार नसल्याचेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

शहरातील सर्वे नंबर १५ मधील आरक्षण क्रमांक ३२ मध्ये येत असलेली जागा पेट्रोल पंप उभारण्यासाठी भाड्याने देण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने, परतावा स्वरूपात पालिकेकडे पाच लाख रुपये डिपॉझिट रक्कम भरून देण्याची मागणी केली असून या विषयावर झालेल्या चर्चेत पा स्वठा सभापती नासीर शेख याने विरोध दर्शवत पालिकेच्या शॉपिंग कॉम्प मधील गाळेधारकांकडून नापरतावा डिपॉझिट जखम भरून घेतली जाते मग हा दुजा भाव का?असा सवाल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!