सावंतवाडीचे प्रथम नागरिक कोरोना पाँझिटिव्ह
सावंतवाडी,दि.३१: कोरोना काळात सावंतवाडीत खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा म्हणून काम केलं तेच सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
संजू परब यांची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही त्यांना लक्षणे नाही आहेत. थोड्याच वेळात संजू परब एकतर सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार आहेत.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्या तसेच कोरोना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.

