◾वैभववाडी तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक व सोनाळीचे उपसरपंच अशोक चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴 वैभववाडी,दि-१३ :- वैभववाडी तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक व सोनाळीचे उपसरपंच अशोक गोविंद चव्हाण वय ६७ यांचे झाले. कोल्हापूरला उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी सोनाळी गावासह तालुक्यात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
चव्हाण गेली सहा वर्षे गगनगिरी कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून वैभववाडी शहरात बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. शहरात त्यांनी गृह प्रकल्प उभे केले होते. या क्षेत्रात त्यांनी विश्वासाच नातं निर्माण केलं होत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. कोरोनात गरीब कुटुंबाना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आधार दिला होता. सोनाळी ग्रामपंचायतीवर त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सोनाळी गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

