◾विनोद मिरगलांच्या अथक प्रयत्नाने मुचरी भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याचे काम पूर्णत्वास..
◾भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१३ :- संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावातील तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विनोद मिरगल यांच्या अथक प्रयत्नाने भालेकरवाडी ते धाकोंडी या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे त्यांनी ही कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार सरपंच विकास बेटकर आणि उपसरपंच पांडुरंग भोजने यांनी काढले.भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच विकास बेटकर आणि पांडुरंग भोजने यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उद्योजक चंद्रकांत भोजने यांनी कोविड निर्बंधामुळे उपस्थित राहता येऊ न शकल्याने सदरच्या कामाला शुभेच्छा पाठवताना या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.विकासासाठी आपण सदैव गावच्या सोबत असल्याचे देखील त्यानी सांगितले.आमदार शेखर निकम,जगन खेडेकर, वसंत तटकरे,सुजित तटकरे,श्रीमती शशिकला भिकाजी महाडिक आदी मान्यवरांनी रस्त्यासाठी जागा देणारे ग्रामस्थ व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट संगमेश्वर शाखा मुंबईचे कार्याध्यक्ष जी.झे.टोपरे यांनी स्वखर्चातुन रस्त्यासाठी योगदान दिले.तर दत्ताराम भालेकर,बाबुराव भालेकर यांनी या कामासाठी अथक परिश्रम घेतले.यावेळी पूजा भालेकर,लक्ष्मी खताते,सुलोचना गवळी,गंगाराम झिमाजी टोपरे ,बारक्या भालेकर,संतोष भालेकर,विजय भालेकर,गोविंद गवळी,विजय महाडीक,गोपाळ महाडीक,शरवरी महाडीक,रघुनाथ महाडीक,प्रकाश भालेकर,दत्ताराम भालेकर ,सिताराम भालेकर,रमेश मिरगल,जयवंत मिरगल,शांताराम तटकरे,नंदू भालेकर,चंदू भालेकर ,श्रीराम भालेकर,कृष्णा महाडीक,यशवंत महाडीक ,वसंत महाडीक,बबन भालेकर,लक्ष्मी भालेकर,गोपाळ मिरगल,रमेश कांबळे,बाळाराम खेडेकर,विष्णू भोजने,आदी जमीन मालकांचा सन्मान करण्यात आला.प्रभाकर भोजने,पांडुरंग भालेकर ,शांताराम कांबळे,पांडुरंग तटकरे आणि वाडीतील समाजबांधवांचे याकामासाठी सहकार्य लाभले.

