आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसामाजिक

◾वैभववाडी तालुक्यात सापडले नव्याने तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-१३ :- वैभववाडी तालुक्यात कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. चोवीस तासात तालुक्यात नव्याने तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आढळून आलेल्या रुग्णात वैभववाडी २, दिगशी १५, एडगांव ४, करुळ ८, खांबाळे १, नाधवडे २, नापणे ३, नावळे २, उपळे १ यांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ३९४ झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या १३९ इतकी आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात एकूण ३७ ठिकाणे कंटेनमेंट झोन करण्यात आली आहेत. पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. आरोग्य यंत्रणा खुपच तोकडी पडत आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास मास्क लावावे. अशा सूचना वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!