कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾बांदा – दोडामार्ग रस्त्यासाठी मंजूर केलेले १४ कोटी कागदावरच राहणार का? ; भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिपक गवस

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-१३ :- बांदा – दोडामार्ग हा रस्ता गेली अनेक वर्षे अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. हे सर्व जनतेला माहित असून यांचा त्रास मोठया प्रमाणात सर्वांनाच भोगावा लागत आहे नेते मंडळी गोव्यातून येतात जातात त्या मुळे त्यांना आज पर्यंत ह्या रस्त्याची गरज भासली नाही. कोणी सत्ताधारऱ्यांनी जर निधी आणलाय तर त्यात वावगं काय? रस्त्याची दुर्दशा केवळ अपयश लपवण्यासाठी सर्व सामान्य जनतेला ज्या रत्याची गरज आहे त्यात पण केवळ श्रेय भेटण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत असतात. ही नवटंकी आता सत्ताधाऱ्यांनी बंद करावी.

आमदार दिपक केसरकर यांनी येत्या १० दिवसात रस्त्याला सुरूवात केली जाईल असे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात तेथे साधी रस्त्यावरील धुळ सुद्धा हलवली नाही आता तरी सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे व आपले अपयश लपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी वर बोलण्यापेक्षा रस्त्याचे काम करून दाखवावे.

येवढी वर्षे सत्ता असुन सुद्धा रस्ते का होवू शकले नाही. बांदा दोडामार्ग रस्त्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते फक्त कागदावरच दाखवणार का? आमदार दिपक केसरकर यांनी १० दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे सांगितले होतेपरंतु तेथे सुद्धा नाकर्तेपणा समोर येत असल्याने जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच्या अगोदरच सत्ताधाऱ्यांकडून या रस्त्या बाबत योग्य कारवाई झाली असती तर आंदोलनाची वेळच आली नसती असे भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!