◼️ उद्या पासून शहरात सुरू होणाऱ्या मोबाईल टेस्टिंग सेंटर चा नागरिकांनी लाभ घ्यावा ; शशिकांत मोदी
◾शहरातील अत्यंत गरजवंत आणि अपंग बांधवांना होणार लाभ ; नगरपालिका आरोग्य विभागाचा उपक्रम..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-१३:- उद्या दि.१४ एप्रिल पासून चिपळूण शहरात विविध ठिकाणी सुरू होणाऱ्या मोबाईल टेस्टिंग सेंटर सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण नगरपरिषद आरोग्य सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी यांनी केले आहे.
चिपळूण शहरातील विविध भागात जनतेच्या सोयी साठी मोबाईल टेस्टिंग सेंटर उद्या पासून सुरू होणार आहे.स.१०.३० ते दु.१.३० या वेळेत ही मोहीम शहरात सुरू असणार आहे,शिवाय यात आर.टी. पी.सी.आर आणि अँटीजन या दोन्ही टेस्ट मोफत होणार आहे,नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीत अशी माहिती मोदी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. हे मोबाईल टेस्टिंग सेंटर गरजू नागरिकांना सोयी चे होणार आहे. ज्या नागरिकांना कोरोना टेस्टिंग साठी सेंटर वर येता येणार नाही अश्या नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी सौ.जोती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिपळूण नगरपालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे, आजारी रुग्ण, १००% टक्के अपंग बांधवांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तरी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केले आहे.

