आणखीकोकणक्राइमवेंगुर्लेसिंधुदुर्ग

आरवली सोनसुरे येथे तीन पत्ती जुगारावर वेंगुर्ला पोलिसांकडून कारवाई

◾कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या बातमीचा इफेक्ट…

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ला : दि. १३ आरवली सोनसुरे येथील स्मशानभूमी लगत तीन पत्ती जुगारावर काल दुपारी २ : १५ च्या सुमारास वेंगुर्ला पोलिसांकडून छापा टाकला. तेथे पैसे लावून खेळ खेळविला जातो असे वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने प्रसिद्ध केले होते. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सावंत, चौहान, सावंत, कांडर, परब सहित घटनास्थळी दाखल झाले.

सदर इसमांना चहुबाजूने घेरले त्यातील एक इसम हा जंगलात पळून गेला, तर तिघांना ताब्यात घेतले. त्यात कृष्णा सावळाराम जाधव (वय. ४९) रा. आसोली – जाधववाडी, रविंद्र जगन्नाथ गावडे (वय. ५७) रा. शिरोडा – गावडेवाडी, संतोष वसंत साकुळकर (वय. ४५) रा. शिरोडा बाजारपेठ, असे आहेत. तसेच पळून गेलेल्याचे नाव अशोक मसुरकर रा. शिरोडा असे आहे. सदर इसमांकडून एकूण ४०६५/- रुपयांचा मुद्देमाल मिळाला, तसेच जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

सदर इसमांवर सद्यस्थिती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जीवित व आरोग्य हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. म्हणून त्यांच्याविरिद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ अ , भादवी कलम १८८, २६९, २७०, २७१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!