आणखीआरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

अबब… सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोना बाधित रुग्ण, शहरातील तीन जणांचा समावेश

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. १२ तालुक्यात आज तब्बल २६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३, तर ग्रामीण भागातील २३ जणांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.शहरात मिळालेल्या रुग्णांमध्ये खासगीलवाडा, सबनीसवाडा व न्यू सालईवाडा या तीन ठिकाणी प्रत्येकी एक, तर ग्रामीण भागात आजगाव मध्ये तीन, मळगाव मध्ये एक, निरवडे एक, माजगाव मध्ये सहा, कारिवडे एक, इन्सुली दोन, शेर्ले तीन, केसरी एक, बांदा येथील तीन अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत तालुक्यात तब्बल अकराशे तीन रुग्ण तालुक्यात आढळले त्यातील ५१ रुग्ण दगावले आहेत तर १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!