◾हेदूळ येथील जयप्रभा हेदुळकर यांचा राहत्या घराला अचानक लागली आग..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि-१२ :- मालवण तालुक्यातील हेदूळ बौद्धवाडी येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जयप्रभा जनार्दन हेदुळकर यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागल्याचे कारण शोधले असता जयप्रभा जनार्दन हेदूळकर यांचा मुलगा हेमंत जनार्दन हेदूळकर याने आग लावली हे निदर्शनास आले .तो मनोरुग्ण आहे. या आगित घरातील वस्तू जळून खाक झाल्या .यात इलेक्ट्रिक मीटर, बेड, घरातील भांडी, सिलिंग फॅन,घरातील वायरिंग, इलेक्ट्रिक बोर्ड ,असे मिळून अंदाजे १३,००० च्या वर नुकसान झाले. हेदूळ सरपंच नंदू गावडे व ग्रामस्थांनी अथक शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. हेदूळ सरपंच नंदू गावडे हेदूळ तलाठी यांनी पंचनामा केला.

