आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरातील सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. १२ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अवघा एक दिवस राहिल्याने सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरातील सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज या कामाची पाहणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन केली आहे. येथील परिसरातील रंगकाम सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्या शेजारी नवीन रेलिंग बसविण्यात येत आहे.

यापूर्वी सातत्याने या भागात डागडुजी करण्याची मागणी अँड परिमल नाईक यांनी केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देत या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर येथील परिस्थितीत पाहून, अँड परिमल नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्या शेजारी असलेले रेलिंग खराब होऊन तुटून गेल्याने येथे नवीन रेलींग बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी नवीन रेलींग बसविण्यात येत आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, येथील संपूर्ण परिसर हा नगरपालिकेकडून दरवर्षी प्रमाणे पाण्याने स्वच्छ धुवून, संपूर्ण परिसरात रंग रंगोटी केली जाणार असल्याची माहिती नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी दिली आहे. तसेच यावर्षी देखील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीत व शासनाचे नियम पाळून जनतेने साजरी करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!