आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या उसप मुख्य रस्त्याचे जिल्हा नियोजन सदस्य बाबुराव धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-१२ :- जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या उसप मुख्य रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन सदस्य बाबूराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मधून १० लाख रूपये मंजूर असून हा रस्ता आता लवकर पूर्णत्वास येणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य बाबुराव धुरी व तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल गावचे सरपंच दिनेश नाईक व ग्रामस्थांनी आभार मानले.

यावेळी बाबुराव धुरी यांच्यासह उसप सरपंच दिनेश नाईक, उपसरपंच अभिषेक गवस, निलेश नाईक, दिपक शेटकर , तुकाराम धुरी, रमा नाईक, कृष्णा गवस , प्रकाश गवस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!