आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण, अपरांत हॉस्पिटल, रोटरी व रोटरॅक्ट क्लब आणि शिक्षक संघटनांच्या वतीने १९ एप्रिलला रक्तदान शिबिराचे आयोजन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-१२ :- सगळीकडेच कोरोना या महाभयंकर रोगामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील प्रगत राष्ट्रांचा विचार केला तर लाखो लोकांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून हजारो लोकांचा दररोज मृत्यू होत आहे.१३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या विकसनशील देशात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सुरुवातीला प्रभावीपणे याची अंमलबजावणी केली आहे. आणि त्यामुळे हा रोग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी आपण चांगले प्रयत्न केले आहेत.याची जागतिक आरोग्य संघटनेने देखील दखल घेतली असून भारताची प्रशंसा केली आहे. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या महामारीने रौद्र रूप धारण केलेले आहे आणि त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण असल्याने आपण सगळेच हतबल झालेले आहोत.

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून व शासनाच्या नियम आणि अटींना अधीन राहून प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिपळूण तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. परंतु कोरोना च्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत अशा प्रकारचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी चिपळूण मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अपरांत हॉस्पिटल, रोटरी क्लब चीपळून, रोटरॅक्ट क्लब चिपळूण पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना , प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, माध्यमिक अध्यापक संघ , शिक्षक परिषद संघटना , शिक्षक भारती संघटना ,चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन इत्यादी सर्व संस्थांच्या आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या विशेष सहकार्याने अपरांत हॉस्पिटल, चिपळूण यांच्याकडे रक्तदान शिबिराचे तातडीने आयोजन सोमवार दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत करण्यात आले आहे.

तरी सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या दात्यांनी मनोज जाधव 9765155354,प्रशांत देवळेकर 9890863449, अमोल टाकळे 9423296920,सिद्धेश लाड 9503606111,विश्वनाथ कांबळे 8888051251, समरीन घारे 9890411148, राजेश दांडेक 9421185799, श्री.कृष्णमूर्ती 9307566700 या नंबरवर आपली नावे शनिवार दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ पर्यंत नोंदवावीत. रक्तदान शिबिराला येताना मास्क सह ओळखपत्र आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!