आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयशैक्षणिक

◾मनसेचे संदिप फडकले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदर्श शाळा असगणी नं-२ साठी लॅपटॉप मदत..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-१२ :- असगणी गावचे सुपुत्र संदिप हरी फडकले कामगार सरचिटणीस म.न.से रत्नागिरी जिल्हा यांनी अथक प्रयत्न करून असगणी शाळा नं – २ साठी डेल कंपनीचा लॅपटाॅप शाळेतील मुलांसाठी मिळवून दिला. जि.प.शाळा असगणी नं.२ शाळेला जि. प. चा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या शाळेची मॉडेल शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.

याआधी संदिप फडकले यांनी पंचक्रोशीतील १८ शाळा डिजिटल केल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. आज दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी लॅपटॉप देण्यात आला. लॅपटॉप देतेवेळी संरपंच अनंत नायनाक, माजी उपसरपंच श्रीकात फडकले, सुरेश नायनाक, धामणदेवी मनसे उपाध्यक्ष अशोक बुरटे, सुनिल धाडवे -शिक्षण कमिटी अध्यक्ष, संजय बुरटे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य चेतन पवार, संदिप धाडवे,राजेंद्र धाडवे, विठ्ठल नायनाक,संजय पदुमले, शांताराम बाईत व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!