कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी घातला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-१२ -: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वारंवार लक्ष वेधून देखील अद्याप पर्यंत त्या रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही? असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला आहे. तसेच जो पर्यंत या रस्तादुरूस्ती करण्या संदर्भात बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यत कार्यालयातून बाहेर पडणार नाही असा पवित्रा भाजप पदाधिकारी घेतला आहे. आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग – बांदा येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात येत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!