‘अहिंदू आणि अश्रद्ध यांना मंदिर प्रवेश बंदी करा’ या विषयावर ऑनलाईन ‘विशेष परिसंवाद’ संपन्न !राज्यघटनेतील ‘कलम 26’ नुसार
◼️‘मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’, हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला आहे ! – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वोच्च न्यायालय
🖥️Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग : दि. १२ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराबाहेर ‘मुसलमानांना मंदिरात प्रवेश वर्जित’ असल्याचा फलक लावल्यावरुन देशभरात मुसलमान, तथाकथित पुरोगामी आणि काही प्रसिद्धीमाध्यमे यांनी विरोध केला. परंतु भारतीय राज्यघटनेतील ‘कलम 26 (ब) आणि (ड)’ नुसार ‘मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’ अथवा ‘कोणाला प्रवेश देऊ नये’ हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे कोणी अहिंदू वा श्रद्धाहीन व्यक्ती मंदिराचे नियम डावलून मंदिरात प्रवेश करुन धार्मिक भावना दुखावत असेल, तर त्याच्या विरोधात हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भा.दं.वि.च्या कलम 295 (अ) नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला हवा, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘अहिंदू आणि अश्रद्ध यांचा मंदिरातील यांना प्रवेश बंदी करा’ या ऑनलाईन ‘विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 16761 लोकांनी पाहिला. तसेच या वेळी ‘ट्वीटर’वर #TemplesOnlyForHindus हा ‘हॅशटॅग’ वापरून हजारो हिंदूंनी याविषयाचे समर्थन केले. हा हॅशटॅग क्र. १ वर होता.
या संदर्भात डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, डासना शिवशक्तीधाम येथे आसिफ नामक युवकाला मंदिरातील पाणी पिण्यावरून हिंदूंनी मारहाण केल्याचे खोटे चित्र साम्यवाद्यांनी उभे केले. वास्तविक धर्मांध आसिफ मंदिराच्या आवारात शिरून शिवलिंगांवर मूत्रविसर्जन कर असल्याचे आढळून आले होते. हे मंदिर मुसलमानबहुल प्रांतात असून मंदिरात चोरी, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मंदिरात येणार्या हिंदू तरुणींची छेडछाड या घटना नित्याच्या झाल्या आहेत. या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केलेली नाही. त्यामुळे हिंदूंच्या रक्षणासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा फलक लावावा लागला. या वेळी ‘सुदर्शन टी.व्ही.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले की, अहिंदूंना प्रवेश नाही, असे फलक केवळ डासना देवी मंदिरात नव्हे, तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रवेशद्वारावर, तसेच नेपाळमध्येही लावण्यात आलेले आहेत. भारतातील जी मंदिरे असे फलक लावण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असतील, त्यांना ‘सुदर्शन टी.व्ही.’कडून आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. या वेळी श्रीराम सेनेचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी म्हणाले की, कर्नाटकातील श्री कोरगज्जा मंदिरातील दानपेटीत धर्मांधांकडून आपत्तीजनक वस्तू टाकून तेथील पावित्र्य भंग करण्याची संतापजनक घटना उजेडात आली असली, तरी ही एकमेव घटना नसून कर्नाटकात गेल्या 10 वर्षांत 60 ते 70 मंदिरांत मूर्ती तस्करी आणि दानपेटीतील चोरीच्या सर्व घटनांमध्ये मुसलमान गुन्हेगारच सापडले आहेत. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अधिवक्ता (कु.) कृतिका खत्री म्हणाल्या की, मंदिरात साक्षात् भगवंत आहे, अशी श्रद्धा ठेवून प्रवेश करणार्यालाच भगवंताचे आशीर्वाद मिळतात. तर मंदिराचे पावित्र्य भंग करणार्यांना मंदिर प्रवेश वर्जित करण्याचा मंदिरांचा निर्णय योग्यच आहे.

