आणखीआपत्कालीनकोकणमालवणसिंधुदुर्ग

जगन्नाथ पावसकर ऊर्फ पावसकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴आचरा : दि. १२ आमदार किरण पावसकर यांचे वडील जगन्नाथ पावसकर ऊर्फ पावसकर गुरुजी (वय-९३) यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी यांनी शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले होते. सोमवारी सकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आमदार किरण पावसकर, डॉ. शाम पावसकर यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!