आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

◾रेमडीसिवर थेट कोविड हॉस्पिटलमध्ये देण्याच्या निर्णयाची रायगडातही होणार अंमलबजावणी..

 

◾कांतीलाल कडू यांनी केली अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या ओएसडींशी चर्चा..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-१२ :- रेमडीसिवरचा काळाबाजार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कोविड हॉस्पिटलला थेट पुरवठा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून त्याची रायगड जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली असता, तसे निर्देश जिल्हाधिकारी रायगड यांना तातडीने देवून अंमलबजावणी करण्याची ग्वाही ना. राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

पनवेलमध्ये एका औषध वितरकाकडे रेमडीसिवरची १०० इंजेक्शन आली होती. इतरांकडे आलेल्या इंजेक्शनचा साठा वेगळा आहे. त्याशिवाय महापालिकेकडे आलेली इंजेक्शन वेगळे. असे असताना पनवेल परिसरातील कोविड रुग्णांची रेमडीसिवर इंजेक्शन प्राप्त करताना ससेहोलपट होताना दिसत आहे. मग इतकी इंजेक्शन नेमकी गेली कुठे, असा प्रश्न सतावत असल्याने कडू यांनी औषध वितरकांनी नेमकी कुणाला इंजेक्शन विकली किंवा त्याचा साठेबाजांकडून गैरवापर होत आहे का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पेण येथील रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त हुंकारे आणि निरीक्षक मुकुंद डोंगलीकर यांच्याकडे मागणी केली आहे. ते सविस्तरपणे माहिती काही वेळाने कडू यांना देणार आहेत.

दरम्यान, कोविड रुग्णांसाठी रेमडीसिवर मिळवताना नातेवाईकांची होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी राज्य शासनाच्या अध्यादेशाची रायगडात अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मागणीनुसार रेमडीसिवरचा थेट पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडे कांतीलाल कडू यांनी केल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सुचना देवून अध्यादेश काढण्यासह रेमडीसिवर उपलब्धतेची अंमलबजावणी करण्याची ग्वाही कडू यांना दिली आहे. कडू यांच्यामुळे हजारो कोविड रुग्ण नातेवाईकांना आधार आणि दिलासा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!