आरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾कुडाळ – पिंगुळी मध्ये कडकडीत बंद..

 

◾विकेंड लॉक डाऊनला उस्फुर्त प्रतिसाद..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-११ :- सध्या महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशभर पुन्हा एकदा कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला कुडाळ/पिंगुळी मध्ये व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठेसह कुडाळ /पिंगुळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व जाहिर झालेले लॉकडाऊन यामुळे कुडाळ /पिंगुळी मध्ये सर्वत्र शांतता होती. अत्यावश्यक मेडिकल व दवाखाने या सेवा वगळता सर्व शांतता होती. कुडाळ /पिंगुळी बस स्थानकात विकेड लोकडाऊनमुळे एसटी बस येत नव्हत्या .प्रवासीही बस स्थानकात नव्हते त्यामुळे कुडाळ बस स्थानकात शुकशुकाट होता. . सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा भार कमी दिसत होता. कुडाळ /पिंगुळी मध्ये सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र शनिवारी/रविवारी सर्वत्र दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!