◾कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोनशी येथे सापडला माकडताप बाधित रुग्ण..
◾आरोग्य यंत्रणेत उडाली एकच खळबळ..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा,दि-११ :- कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोनशी ता. सावंतवाडी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याला उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी दिली.
गेल्या पाच वर्षात बांदा व दोडामार्ग तालुक्यात माकडतापाने धुमाकूळ घातला होता. ऐन काजू हंगामात दूषित गोचिडींच्या प्रदूर्भावाने शेकडो माकडताप बाधित रुग्ण सापडले होते. गेल्या पाच वर्षात बांदा दशक्रोशीमध्ये २० हुन अधिक जणांचा माकडतापाने बळी घेतला होता. बांदा शहरात सटमटवाडी येथे माकडतापाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होता.
वर्षभरात या परिसरात माकडतापाचे रुग्ण न सापडल्याने आरोग्य यंत्रणा निर्धास्त होती. यावर्षी कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच माकडताप बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोनशी येथील रुग्ण ताप येत असल्याने आठ दिवसांपूर्वी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविले होते. रुग्णाला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
त्यानंतर उपचार करून दोन दिवसांपूर्वीच त्याला घरी सोडण्यात आले. या रुग्णाचा माकडताप पॉझिटिव्ह अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाला. कोनशी हे गाव तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने बाधित रुग्ण सापडलेल्या वाडीत आरोग्य विभागाकडून आज स्थानिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ताप, सर्दी असल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे तसेच काजू बागायतीत जाताना डीएमपी ऑइल लावूनच जावे व घरात येताना करताना आंघोळ करूनच प्रवेश करावा आवाहन डॉ. चिपळूणकर यांनी केले आहे.

