◾माड्याचीवाडी खालचिवाडी येथील श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कार्यक्रम रद्द..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि-११ :- माड्याचीवाडी खालचिवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज मठ येथे स्वामी प्रकट दिन आणि त्या निमित्त पालखी सोहळा साजरा केला जातो. परंतु या वर्षी देशात, राज्यात आणि जिल्हातकोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असल्यामुळे सदरिल कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
तरी सर्व भाविक भक्त सेवेकरी यानी आपल्या घरी सुरक्षित राहून स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार करावा असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास च्या वतीने करण्यात आले आहे.

