◾ माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र , ग्रामपंचायत मांगवली यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-११ :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र , ग्रामपंचायत मांगवली यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत मांगवली येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ३६ रक्तदात्यांनी रक्तदानाचे अमूल्य दान केले.
रक्तदान शिबिरासाठी यावेळी जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती मांगवली गावच्या ग्रामस्थ श्रीम. शारदा कांबळे, मांगवली सरपंच श्रीम. सुवर्णा लोकम, सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्राचे अध्यक्ष महेश संसारे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीम.
सुवर्णा संसारे, डॉ. योगेश मोडकर वैद्यकीय अधिकारी जिल्हा ब्लड बँक, सिंधुदुर्ग, डॉ. सुदर्शन साखरे प्राथमिक आरोग्य केंद्र-उंबर्डे आदी मान्यवर व विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
रक्तदानाच्या कार्यात तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा या हेतूने आयोजकांनी लकी ड्रॉ चे आयोजन केले होते. लकी ड्रॉत प्रथम व द्वितीय क्रमांकांच्या विजेत्यांना हेल्मेट व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला बलुटूथचे इअरफोन भेटवस्तू म्हणून देण्यात आले. प्रथम विजेते अभिषेक संसारे, द्वितीय विजेते सुरेंद्र नारकर, तर तृतीय विजेते प्रसाद पालार्डे यांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी राजेंद्र राणे, शिवानी नाटेकर, प्रसाद जावडेकर, स्नेहल राणे, शरद कांबळे यांनी मौलाचे सहकार्य केले.

