◾इन्सुलीत आमदार आणि अधिकाऱ्यांची फक्त आश्वासने,शेतकरी मात्र पाण्याच्या प्रतिक्षेत..
◾उपसरपंच काका चराटकर यांचा स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला वरदहस्त, सदस्या वर्षा सावंत यांचा आरोप..
◾आमच्यावर केसेस टाकायला लावणारे उपसरपंच गावाचे की स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे ; वर्षा सावंत यांचा सवाल..
◾मुख्य कालव्याला पाणी काही येत नाही परंतु पोट कालव्याचे पाणी मुरतंय उपसरपंचांकडे ; शेतकरी-ग्रामस्थ यांना पडलेला प्रश्न..
◾त्या कन्स्ट्रक्शनला घेऊन कितीही पोट कालवे मारा,आमच्या वार्ड मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान करु नका ; वर्षा सावंत यांची उपसरपंचांना विनंती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि-११ :- इन्सुली गावात गेल्या महिनाभरापासून कालव्याला पाणी येईल अशी आश्वासने आमदार तसेच संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना देताहेत परंतु अद्यापही कालव्याचे पाणी इन्सुली गावात पोहोचलेले नाही.आमदार श्री.केसरकर यांनी मार्च अखेरपर्यंत कालव्याचे पाणी इन्सुलीत असे स्टेटमेंट दिले होते परंतु पाणी काही आले नाही त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेऊन सरपंच-उपसरपंच यांच्या साथीने जो पर्यंत मुख्य कालव्याला पाणी येत नाही तोपर्यंत पोटकालवे मारु नका असा आक्रमक पवित्रा घेत स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला काम थांबविण्यासाठी निवेदन दिले होते.याच वेळी तिलारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आजगेकर यांनी फोनवरून आपण एप्रिल १० तारीख पर्यंत इन्सुलीत कालव्याला पाणी येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु अद्यापही पाणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचा मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.गेली १५ वर्षे इन्सुलीच्या कालव्याची कामे चालू आहेत परंतु अद्यापही पाणी आणायला संबंधित विभागाला यश आले नाही,१५ वर्षांपूर्वी कवडीमोल दराने शेतकऱ्यांनी कालव्यासाठी जमिनी विकल्या परंतु पाण्याचा अजून पत्ताच नाही आणि आता पोटकालवे मारुन गुंठा ९००रु. दर देऊन शेतकऱ्यांचा जमिनीचे नुकसान कशाला करताय असा सवाल ग्रामपंचायत सदस्या सौ.वर्षा सावंत यांनी स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना विचारला परंतु आम्ही आमचे चालू ठेवणार अशी उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली,यावेळी उपसरपंच काका चराटकर यानी सुद्धा स्वस्तिक कन्स्ट्रक्शनची पाठराखण करीत शेतकऱ्यांनी पोट कालव्याचे काम अडवले तर त्यांच्यावर केसेस ठोका अशी भुमिका घेतल्याने मुख्य कालव्याला पाणी काही येत नाही परंतु यायच्या आधी पोट कालव्याचे पाणी उपसरपंचांकडे मुरतय की काय असा शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रश्न पडला.यावेळी उपसरपं आणि शेतकरी-ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली,उपसरपं नक्की गावाचे की स्वस्तिक कन्स्ट्रक्शनचे असा सवाल करीत सदस्या वर्षा सावंत यांनी चराटकर यांनी आमच्या वार्ड मध्ये येऊन लुडबुड करू नये सरपंच यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांसमवेत काय तो योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

