◾दीगशी महसुली गावात कोरोना च्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ ; शुक्रवारी एकाच दिवशी आढळले गावात १२ कोरोना रुग्ण..
◾आरोग्य पथका कडून होत आहे कोरोना रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणी करण्यासाठी विनंती ; परंतु संबंधित नागरिकाकडून तपासणीस विरोध..
◾आरोग्य पथकाबरोबर पोलीस कर्मचारी गावात पाठविण्यात यावे यासाठी तिथवली ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले निवेदन..
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-१० :- दीगशी महसुली गावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी गावात १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणी होणे फार गरजेचे आहे. आरोग्य पथक संपर्कातील व्यक्तींना तपासणी करण्यासाठी विनंती करत आहेत. परंतु संबंधित नागरिकाकडून तपासणीस विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य पथकाबरोबर पोलीस कर्मचारी गावात पाठविण्यात यावेत. या मागणीचे निवेदन तिथवली ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले आहे.
दीगशीत कंटेनमेंट अजून जाहीर करण्यात यावे. गावातून बाहेर जाणारे प्रमुख मार्ग बंद करण्यात यावे. तसे न झाल्यास याचा धोका संपूर्ण तालुक्यात होण्याची शक्यता आहे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, तिथवली सरपंच सुरेश हरयाण, पोलीस पाटील गणेश हरयाण, इब्राहिम काझी आदी उपस्थित होते.

