आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला व नातेवाईकांशी रोज फोनवर बोलणारा आमचा रुग्ण मयत होऊच शकत नाही ; महेशकाका गोखले

 

◾आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभार बाबत नाधवडे गावात तीव्र संताप..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-१० :- ओरोस येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला व नातेवाईकांशी रोज फोनवर बोलणारा आमचा रुग्ण मयत होऊच शकत नाही. तो बेपत्ता झाला असावा. असा आरोप नाधवडे येथील रहिवासी महेशकाका गोखले यांनी प्रशासनावर केला आहे. त्याला शोधून काढण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर सदर रुग्ण मयत झाला असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभार बाबत तीव्र संताप नाधवडे गावात उमटत आहे.

नाधवडे व्हेळकरवाडी सध्या कोरोनाचा हाँटस्पाँट बनला आहे. वाडीतील एका ५५ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली. डॉ. अभी पाटील यांच्या सल्ल्यानुसार सदर रुग्णाला चार एप्रिल रोजी उपचारासाठी ओरोसला पाठविण्यात आले. तो रुग्ण फोनवर आपल्या पत्नीशी रोज बोलत होता. आठ एप्रिल नंतर त्याचा फोन लागणे बंद झाले. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांना आपण फोन केला त्यांनी माहिती घेतो आणि कळवतो असे सांगितले. पण अद्यप त्यांचा फोन आला नाही. ओरोस कोवीड केअर सेंटर मध्ये कॉल केला असता सदर रुग्ण शुक्रवारी मयत झाल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. असे पत्रकात महेश गोखले यांनी म्हटले आहे.

रोज फोनवर बोलणारा रुग्ण अचानक मयत कसा होऊ शकतो. तो बेपत्ता झाला असावा. जर तो मयत झाला असेल तर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा तो बळी आहे. असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. तो मयत झाला तर संबंधित नातेवाईकांना का सांगण्यात आले नाही. असा सवालही गोखले यांनी उपस्थित केला आहे. पत्रकात जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सरपंच अनिल नारकर यांनी स्वाक्षरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!