आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◼️एक दिवस दिव्यांग बांधवांच्या लसीकरणासाठी ; आरोग्य सभापती शशिकांत मोदी

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-१० :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिपळूण शहरातील दिव्यांग बांधवांना लस देण्यासाठी एक दिवस जाहीर करावा अशी मागणी जिल्हा शैल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी केली आहे.

चिपळूण शहरातील नागरी केंद्रावर कोरोनाचे वाढते रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी लस देण्यात येत आहे. मात्र सकाळी ८:३० वाजल्यापासून शहरवासीय तेथे लस घेण्यासाठी रांगेत उपस्थित असतात, त्यामुळे दिव्यांग शहरवासियांना रांगेत उभे राहून लस घेणे शरीराच्या दृष्टीने हानिकारक आहे म्हणून शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना सरकारी लस देण्यासठी एक दिवस जाहीर करावा जेणेकरून सर्व दिव्यांग एकाच दिवशी लस घेवू शकतील. त्यामुळे दिव्यांग बांधवांना होणारा त्रास कमी होईल. या विषयाचे निवेदन आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी जिल्हा शैल्य चिकित्सक सौ. फुले व जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी सौ. कमलापूरकर व तालुका वैद्यकीय अधिकारी सौ.यादव यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!