◾चिपळुणात केदारी मॅंगोजला उत्स्फूर्त प्रतिसाद..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण दि-१० : – येथील तरुण यशस्वी व्यवसायिक अक्षय केदारी यांच्या ‘केदारी मॅंगो’ या आउटलेटचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नुकतेच झाले. शहरातील शिवाजीनगर बस स्थानकासमोरील शंकर मंदिरासमोर केदारी मॅंगो सुरू झाले आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच मुंबई-पुण्यातील लोकांना रत्नागिरी, देवगडमधील अस्सल हापूस आंबा मिळावा, या हेतूने हे केदारी मॅंगोज आऊटलेट सुरू करण्यात आले आहे. अत्यंत दर्जेदार आंबा या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार रमेशभाई कदम, माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयंद्रथशेठ खाताते, शिरीष काटकर ,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक अविनाश केळसकर, लक्ष्मण शिंदे, अर्बन बँक संचालक सतीश आप्पा खेडेकर, मंगेश पेढांबेकर, महम्मद फकीर,पंचायत समिती सभापती रिया कांबळी, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, मा. नगराध्यक्ष रिहाना बीजले, दशरथ दाभोळकर, पंचायत समिती सदस्य बाबु साळवी, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संतोष तडसरे, नगरसेवक मोहन मिरगल , मा. नगरसेविका आदिती देशपांडे, अक्षय केदारीचे वडील हनुमंत केदारी, आई सविता केदारी, राजु जाधव, सिद्धेश लाड, अनिरुध्द निकम, अभिजित खताते, सीमाताई चाळके, दीपिका कोतवडेकर, रंजीता ओतरी, रतन पवार, रमेश खळे आदी उपस्थित होते.

