◾रोटरी क्लब, सावंतवाडीने मोठ्या जोशात रोटरी क्लबचे सदस्य रो.प्रविण परब यांच्या “स्मार्ट-गाव-पुरस्कार प्राप्त कुंब्रल” या गावी साजरा केला “राष्ट्रीय जल संधारण दिन”..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-१० :- “राष्ट्रीय जल संधारण दिन” रोटरी क्लब, सावंतवाडीने मोठ्या जोशात रोटरी क्लबचे सदस्य रो.प्रविण परब यांच्या “स्मार्ट-गाव-पुरस्कार प्राप्त कुंब्रल” या गावी साजरा केला. निमित्य होते ते संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधुन घेणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील हे”स्मार्ट-गाव- कुंब्रल” आणि या गावच्या विकासासाठी या ग्रामपंचायतीला मिळालेल्या राज्य आणि अनेक पुरस्कार याचे खरे मानकरी सरपंच रो.प्रविण परब यानी यानिमित्याने कोरोनाचे सर्व निर्बंध पाळुन आयोजित केली होती. हे औचित्य साधुन रोटरी क्लब, सावंतवाडीनी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ याच्या हस्ते “स्मार्ट-गाव-पुरस्कार प्राप्त कुंब्रल” गावचे स्मार्ट सरपंच रो.प्रविण परब यांच्या कार्याचा गौरव करीत त्याना शाल श्रीफळ देऊन गौरविले. आणि यानिमित्याने त्याना देण्यात आलेले “सुपारीचे रोपटे” ग्रामपंचायतीच्या परीसरात लाऊन “वृक्षारोपण आणि पर्यावरणाचा संदेश” ही यानिमित्याने देण्यात आला. यावेळी “माता आणि बालक संगोपन” या रोटरीच्या 7 उद्दिष्टां अंतर्गत “हिरकणी कक्षाचे” उदघाटन रोटरी-अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यांच्या हस्ते आणि स्मार्ट सरपंच रो.प्रविण परब यांच्या उपस्थितीत करुन माताना आपल्या तान्हुल्याला दूध पाजण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आली.
त्यानंतर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोणातून केलेल्या कामांची पहाणी रोटरी सदस्यां कडून करण्यात आली. यात जल-संधारणाच्या दृष्टीने झालेल्या कामाचे कौतुक कार्यक्रमानंतर या जल संधारण दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

