◾कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या कुटुंबीयांनी केल्या कै.डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनला रुग्णसेवेसाठी आरोग्यविषयक वस्तू प्रदान..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-०९ :- कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या कुटुंबीयांनी येथील सामाजिक, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या कै.डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनला रुग्णसेवेसाठी आरोग्यविषयक वस्तू प्रदान केल्यात.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत, खजिनदार मंगलदास साळगावकर, सचिव मनोज कल्याणकर, सदस्य डॉ. भालचंद्र कोकाटे, डॉ. तुषार कासकर, डॉ. संजय सावळ, सुधीर शिरसाट, केदार कणबर्गी आदी उपस्थित होते. यावेळी गायतोंडे कुटुंबीयांनी २ वॉकर, २ आरामखुर्ची, व इतर वैद्यकीय साहित्य सुपूर्द केले.
डॉ. कल्याणकर फौंडेशनने आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरसह, बेड, वॉकर यांचा समावेश आहे. यापुढेही गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्याची गरज असल्यास मनोज कल्याणकर किंवा मंगलदास साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत यांनी यावेळी केले.

