सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी – रविवारी कडक लाॅकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴सिंधुदुर्ग (ओरोस) : दि. ०९
पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी – रविवारी कडक लाॅकडाऊन आहे. मागच्या वेळापेक्षा कडक लाॅकडाऊन करण्यात आला आहे.
आजपर्यंत ८२८ कोरोना रूग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. ३२५ होमआयसोलेश, ६ ऑक्सिजनवर, ५ व्हॅटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. एकुण ७७४८७ कोरोना टेस्ट असुन, २१ ते ३० गटातील दोन मृत्यु , ६१ ते ८० वयोगटातील ५० मृत्यु झाले आहेत.
६६२४० डोस प्राप्त झाले, पैकी ६२६२५ डोस देण्यात आले, तर ११७० डोस शिल्लक आहेत. जर केंद्राकडून डोस आले नाहीत, तर लसीकरण बंद करावे लागेल. सरकारी वसतीगृह खबरदारी म्हणून ताब्यात घेण्यात आली आहेत. कोव्हीड रूग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील कोव्हीड सेंटर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी कडक निर्णय घेतलाय. जनतेने सहकार्य करावे, दोन दिवसांच्या कडक बंदनंतर निर्णय घेतला जाईल. सोमवारी लाॅकडाऊनची पुढील दिशा ठरणार आहे.
एस. टी. सेवा, वाहतूक, दुचाकी व चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. फक्त अत्यावश्यक, मेडीकल व आरोग्यसेवा चालू राहतील. दुकान, हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट, पाणपट्टी दुकान याशिवाय अन्य दुकाने देखील बंद असतील. जिल्हात कडक बंदोबस्त असेल, जनतेने घराबाहेर पडू नये. सरकार व प्रशासनास सहकार्य करावे.
या पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बॅकेचे चेअरमन सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

