कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾विलवडे(टेंबवाडी) नं. २ प्रशालेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

 

🖥️ Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

 🎴बांदा,दि-०९ :- जि.प. विलवडे (टेंबवाडी) शाळा नं. २ प्रशालेत दरवर्षी प्रमाणे उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव व बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात या टेंबवाडी अंगणवाडी व प्रशालेतील आजी माजी सर्व विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी,स्कूलबॅग व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संजय सावंत व प्रमुख पाहुणे विलवडे सरपंच रावजी दळवी, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती कृष्णा सावंत, माजगाव केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी उपसरपंच प्रकाश दळवी, आशिका सावंत,ग्राम पं सदस्य साक्षी दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, संजय सावंत,संदीप सावंत,कीर्ती दळवी,अंगणवाडी सेविका सायली दळवी,मनाली दळवी,राजू नाईक,बांदा केंद्राचे केंद्र प्रमुख संदीप गवस, माजगाव केंद्राचे केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत,मालू लांबर,हितेश सावंत,विश्वास सावंत, देवानंद सावंत,भालचंद्र गवस,सर्व पालक,विविध शाळा समिती सदस्य सर्व आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश सावंत, सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुरेश काळे यांनी केले व आभार उपशिक्षक सचिन शेळके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!