आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾अष्टविनायक तरुण मित्रमंडळ, शेर्ले, एस. आर. ग्रुप शेर्ले आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न.. 

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

 🎴बांदा,दि-०९ :- शेर्ले सरपंच उदय धुरी यांच्या संकल्पनेतून अष्टविनायक तरुण मित्रमंडळ, शेर्ले, एस. आर. ग्रुप शेर्ले आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेर्ले परिसरातील ४० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यावेळी उद्घाटन प्रसंगी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत,समाज कल्याण सभापती अकुंश जाधव, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, सरपंच उदय धुरी, डेगवे माजी उपसरपंच मधुसूदन देसाई, उपसरपंच प्रविण देसाई ,श्याम सावंत व डाँक्टर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात रक्तदान शिबिरास जि.प.सदस्य उन्नती धुरी, विद्याधर नाईक, तानाजी धुरी, अजय आरोसकर, श्याम सावंत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे चे प्रकाश तेंडुलकर , सुत्रसंचालन शिक्षक बाबाजी झेंडे,आणि आभार उदय धुरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!